पर्यटनस्थळे बंद असूनही ; मोजके पर्यटक टाटालेक धबधब्यावर..!
टाटा लेक धबधब्यात आज काही पायी चालत आलेल्या मोजक्या पर्यटकांना पांढऱ्या शुभ्र पाण्यात भिजण्याचा आनंद मिळाला.
पर्यटनस्थळे बंद असूनही ; मोजके पर्यटक टाटालेक धबधब्यावर..!
आवाज न्यूज:लोणावळा ता.१४(प्रतिनिधी ) लोणावळा परिसरातील भुशीडॕमचे परिसरातील व टायगर पाँईंट , लायन्स पाँईंट , लोहगड , विसापूर , तिकोना , तुंग , या गडकिल्ले व एकविरा देवी मंदिर , कार्लालेणी , भाजेलेणी आदी बंद ठेवण्याचे आदेश पुणेजिल्हा जिल्हाधिकारी डाॕ.राजेश देशमुख यांनी दिल्याने लोणावळा शहर व ग्रामिणचे पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवला असून भुशीडॕमकडे जाणाऱ्या मार्गावर लोणावळा शहर पोलिसांकडून बॕरिगेट लावून पर्यटकांना मज्जाव करण्यात येत आहे.
शहर पोलिसांकडून तीनचार पोलिसांकडून भुशीडॕमचे रस्त्याची नाकाबंदी करण्यात आली आसल्याचे बाहेरगावच्या पर्यटकांचा चांगलाच हिरमोड झाला.
अनेक टपरीचालक यांचेकडून टपरी बंद ठेवण्यात आली. तसेच काही टपरीधारकांवर आज पोलिसांकडून टपरी बंद करण्याची सूचना वारंवार दिली जात होती. टाटा लेक धबधब्यात आज काही पायी चालत आलेल्या मोजक्या पर्यटकांना पांढऱ्या शुभ्र पाण्यात भिजण्याचा आनंद मिळाला.
लोणावळा शहर पोलिसांकडून व नगरपरिषदेच्या वतीने सायंकाळी पाच नंतर कुणाला सोडण्यात येणार नसल्याचे फलक टाटा तलावाचे जवळ लावलेला आढळला ..
ता.१७ पर्यत पर्यटनस्थळे बंद ठेवण्यात आल्याचे सोशल मिडीयावरून लोकांना समजले..विविध वाहिन्यावरूनही जनजागृती करण्यात आली. अनेक वृत्तपत्रांनी बातम्या दिल्याचे पहायला मिळाले;असे असतानाही शेकडो पर्यटक भुशीडॕमकडे जाण्यासाठी या मार्गावर आलेले पहायला मिळाले..पोलिसांकडून असंख्य वाहनांना परत पाठविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागत होते….



