स्वच्छ सर्वेक्षण अभियानात चौथ्यांदा पुरस्कार ; लोणावळ्यात जल्लोष यात्रेचे आयोजन
लोणावळा : लोणावळा शहराला स्वच्छ सर्वेक्षण अभियाना अंतर्गत देशातील दुसऱ्या क्रमांकाचे स्वच्छ शहर हा पुरस्कार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते मिळाला. या निमित्ताने लोणावळा शहरात जल्लोष यात्रा काढण्यात आली.
मावळा पुतळा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक दरम्यान काढण्यात आलेल्या या जल्लोष यात्रेत लोणावळा शहरातील मान्यवरांनी सहभाग घेतला होता. घोडे, उंट, लेझीम व फटाक्यांची अतिषबाजी करत यात्रा संपन्न झाली.
या कार्यक्रमा दरम्यान शहरातील स्वच्छता कर्मचारी व मुकादम यांना सन्मानित करण्यात आले. बिग बॉस मराठी विजेता मेघा धाडे व सिने अभिनेत्री आयेशा झुल्का यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली. मान्यवरांनी यावेळी आपली मनोगते व्यक्त केली.

या कार्यक्रमाप्रसंगी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्षा सुवर्ण अकोलकर, मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, भाजपाचे तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रमोद गायकवाड, भाजपा शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल, ज्येष्ठ नगरसेवक श्रीधर पुजारी, राजू बच्चे,आरोग्य समिती सभापती रचना सिनकर, पूजा गायकवाड, बिंद्रा गणात्रा, मंदा सोनवणे, देविदास कडू, आरोही तळेगावकर, संध्या खंडेलवाल, निखील कवीश्वर, संजय घोणे, दिलीप दामोदरे आदी मान्यवर उपस्थित होते.



