ताज्या घडामोडी

नागरिक मंच तळेगाव दाभाडे यांच्या वतीने मधुमेह दिनानिमित्त आरोग्यशिबिर

Spread the love

तळेगाव : नागरिक मंच तळेगाव दाभाडे, नगरसेवक निखिल भगत, डाॅ.नेहा कुलकर्णी ( योगिराज क्लिनिक) यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मधुमेह दिनानिमित्त तळेगाव दाभाडे येथील नागरिकांसाठी दि.18 नोव्हेंबर रोजी ताई आपटे प्रतिष्ठान हाॅल, छत्रपती शिवाजी महाराज चौक, तळेगाव स्टेशन येथे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते.

या शिबिराला तळेगाव नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांची रक्तातील साखर तपासून योग्य मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आलेल्या सर्व नागरिकांना बी व डी व्हिटॅमिनच्या गोळ्या मोफत देण्यात आल्या. कोविड संसर्गानंतर मधुमेहाचा धोका वाढत असल्याने भविष्यात अशा विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन करणार असल्याचे नगरसेवक निखिल भगत यांनी या प्रसंगी बोलताना आवर्जून सांगितले.

डाॅ. नेहा कुलकर्णी यांनी नागरिकांची तपासणी करून समुपदेशन केले. निरंजन जहागीरदार, निलेश जाचक व त्यांच्या सहकार्यांनी या शिबिरासाठी विशेष परिश्रम घेतले. नागरिक मंच तर्फे असे विविध उपक्रम राबवणार असल्याचे सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!