कातवी उड्डाणपुलाखालील सेवा रस्त्याची झालेल्या दुरवस्थेची तात्पुरती डागडुजी
वडगाव : नवलाख उंबरे रस्त्यावरील कातवी पुलाखालील दोन्ही सेवा रस्त्यांची दुरवस्था झाल्याने या रस्त्याने प्रवास करणारे वाहन चालक खड्ड्यांमुळे त्रस्त झाले होते. तसेच गंभीर अपघात होण्याचा धोका निर्माण झाला होता. यासंदर्भात आवाज न्यूज ने बातमी प्रसारित करत वाचा फोडली होती.

या रस्त्याच्या दुरुस्तीची स्थानिक नागरिकांनी व माजी उपसरपंच विशाल वहिले यांनी मागणी केली होती. आवाज न्युजची बातमी व स्थानिक नागरिकांची मागणी लक्षात घेत वडगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी मुरूम उपलब्ध करून दिला. स्थानिक कार्यकर्ते दत्तात्रेय पिंपळे यांनी जेसीबीच्या साह्याने सर्व खड्डे बुजवून तात्पुरत्या स्वरूपात खड्ड्यांची डागडुजी करण्यात आली आहे.
त्यामुळे खड्ड्यात गाडी आतून होणाऱ्या त्रासाची आणि अपघातांची शक्यता कमी झाली असली तरी मुरमा वरून गाड्या घसरणे, गाड्यांच्या टायरमुळे दगड उडणे अशा घटनांची शक्यता वाढली आहे. तरी प्रशासनाने लवकरात लवकर याची दखल घेऊन डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. सध्या तात्पुरत्या स्वरूपाचे डागडुजी केली असून मार्च 2022 नंतर या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येईल अशी माहिती आवाज न्यूजशी बोलताना मयूर ढोरे यांनी दिली.




