ताज्या घडामोडी

सोमवारी तळेगाव दाभाडेत मोफत मधुमेह शिबिराचे आयोजन

Spread the love

तळेगाव : जागतिक मधुमेह दिनानिमित्त तळेगाव दाभाडे येथील अथर्व मेडिकल फाउंडेशनतर्फे सोमवारी (ता. 15) मोफत मधुमेह आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

कोरोना काळात कोविड19 च्या प्रोटोकॉल दरम्यान मधुमेहींना त्यांच्या आरोग्याच्या कठीण समस्यांना सामोरे जावे लागले होते. या शिबिरात अलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद आणि विविध विकारांवर उपचार करणारे तज्ज्ञ रुग्णांच्या तपासण्या करणार आहेत, अशी माहिती अथर्व फाउंडेशनचे संचालक डॉ. राजेंद्र देशमुख आणि डॉ. अजित माने यांनी दिली.

मधुमेह तज्ज्ञ डॉ. सुदीप कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या मोफत शिबिरात रुग्णांसाठी नोंदणीची सोय केली असून शासनाने जारी केलेल्या कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे अथर्व हॉस्पिटलच्या व्यवस्थापिका सारिका शिंदे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!