ताज्या घडामोडी

संप मिटेपर्यंत एस.टी. कर्मचाऱ्यांच्या जेवणाची सोय करत किशोर आवारे यांनी दिला पाठिंबा

Spread the love

तळेगाव : एस.टी. महामंडळाचे शासनामध्ये विलीनीकरण करण्याच्या प्रमुख मागणीसाठी संपूर्ण राज्यात कामबंद आंदोलन पुकारत एस.टी. कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे.

तळेगाव दाभाडे आगारातील कर्मचारी संपात सामील झाले आहेत. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस ऐन दिवाळीच्या तोंडावर कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या बेमुदत संपानंतर राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य करत संप मागे घेण्याचे आवाहन केले होते. मात्र एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर अजूनही तोडगा न निघाल्याने आंदोलन तीव्र करत संप पुकारण्यात आला आहे.

या संपात सहभागी होऊन आज (8 नोव्हेंबर) पासून तळेगाव आगाराबाहेर निदर्शने करण्यासाठी सहभागी कामगारांची जनसेवा विकास समितीनचे संस्थापक किशोर आवारे यांनी भेट घेऊन पाठिंबा देत मार्गदर्शन केले.

एस.टी. कर्मचाऱ्यांच्या लढ्याला तळेगावकर नागरिकांच्या वतीने पाठिंबा जाहीर करत किशोर आवारे यांनी संप मिटेपर्यंत सहभागी कामगारांच्या दोन वेळच्या जेवणाची सोय केली. तळेगाव आगारातील सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने किशोर आवारे यांनी पाठिंबा देत केलेल्या मदतीबद्दल आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!