ताज्या घडामोडी

बाळासाहेब घोटकुले यांच्या वाढदिवसानिमित्त पवनानगर मध्ये कीर्तन सोहळ्याचे आयोजन

Spread the love

पवनानगर : पुणे जिल्हा भारतीय युवा मोर्चाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब घोटकुले यांच्या वाढदिवसानिमित्त किर्तन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कीर्तन सोहळ्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

हभप रामरावजी ढोक यांचे कीर्तन रविवार (31 ऑक्‍टोबर) रोजी पवनानगर येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी पंचक्रोशीतील हजारो श्रोते उपस्थित होते.लॉकडाऊन नंतर दीड वर्षाच्या कालावधीनंतर किर्तन प्रत्यक्ष ऐकण्याचा आनंद मिळाल्याने उपस्थित नागरिक टाळ- मृदुंगाच्या तालावर तल्लीन झाले होते.तर लाखो भाविकांनी थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून कीर्तनाचा लाभ घेतला.

यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांसह तालुक्यातील आजी-माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बाळासाहेब घोटकुले यांनी कोरोना काळात केलेल्या रुग्णसेवेची किर्ती आमच्यापर्यंत पोहोचली असल्याचे कीर्तनकार रामराव ढोक यांनी आपल्या कीर्तनात आवर्जून नमूद केले. तर माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी बाळासाहेब घोटकुले यांच्या कार्याचे कौतुक केले.

या सोहळ्यानंतर कोरोना काळात उल्लेखनीय काम करणाऱ्या योद्धयांचा सन्मान करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!