ताज्या घडामोडी

डॉ. अमरसिंह निकम यांना डॉक्टरेट पदवी प्रदान

नेल्सन मंडेला शांती पुरस्कराने सन्मानित

Spread the love

मुंबई  : येथे झालेल्या कार्यक्रमात डॉ. अमरसिंह निकम यांना डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले. जागतिक दर्जाच्या शांततेसाठी काम करणाऱ्या असोसिएशनच्या माध्यमातून  नेल्सन मंडेला पीस बोर्ड अवार्ड 2021 देऊन डॉ. अमरसिंह निकम यांचा गौरव करण्यात आला.

मुंबई येथील पंचतारांकित हॉटेल सहारा स्टार मध्ये झालेल्या दिमाखदार सोहळ्यामध्ये त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार  इजराइलचे परराष्ट्रमंत्री, संगीतकार अनु मलिक व गायक आदित्य नारायण तसेच इतर राज्यातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये  प्रदान करण्यात आला.

डॉ. अमरसिंह निकम यांनी आजपर्यंत होमिओपॅथीच्या माध्यमातून हजारो रुग्णांवरती उपचार केलेले आहेत. पिंपरी येथील आदित्य हॉस्पिटलच्या माध्यमातून ते गेल्या अनेक वर्षापासून गोरगरीब जनतेची सेवा अतिशय माफक दरात करत आहेत.

कोरोना काळामध्ये डॉ. निकम यांनी स्वतः तयार केलेल्या होमिओपॅथिक औषधांच्या माध्यमातून अनेक रुग्णांना कोरोणा मुक्त केले.त्यांनी होमिओपॅथिक व आयुर्वेदिक विषयावर अनेक पुस्तके प्रसिद्ध केलेली आहेत. डॉ. निकम यांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तसेच भारत देशभर पसरली आहे. अशा नामवंत डॉक्टरांना नेल्सन मंडेला शांती पुरस्कार देऊन डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!