ताज्या घडामोडी

तळेगावात रंगणार सुरमयी दिवाळी पहाट

Spread the love

तळेगाव : लायन्स क्लब ऑफ तळेगाव, साक्षी डायग्नोस्टिक, साक्षी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळीनिमित्त तळेगावातील रसिक नागरिकांसाठी दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

बुधवारी (3 नोव्हेंबर) रोजी पहाटे 6 वाजता लायन्स क्लब हॉल, डॉ. भंडारी खुला रंगमंच, कडोलकर कॉलनी येथे हा सुरेल कार्यक्रम प्रेक्षकांच्या उपस्थितीत रंगेल.

कार्यक्रमात गायक सतीश देशपांडे, शेखर व्यास, वैशल शहा, दिगंबर कुलकर्णी, सुभाष वाळुंज, सतीश खरात, सुधाकर बाविस्कर, प्रकाश जोशी, मिलिंद अच्युत बहारदार मराठी व हिंदी गीते सादर करतील. अनिल धर्माधिकारी व दिपाली भोंडे कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत.

कार्यक्रमाचे आयोजन लायन्स क्लब ऑफ तळेगावचे अध्यक्ष दीपक बाळसराफ, समन्वयक डॉ. शाळीग्राम भंडारी, प्रकल्प अधिकारी महेश शहा, सचिव गौरव शहा, खजिनदार राजेंद्र झोरे, सिद्धार्थ किल्लावाला यांनी केले आहे.

कार्यक्रमाला जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थिती लावून या सुमधुर कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!