ताज्या घडामोडी

अलिबागमधील नवगाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

Spread the love

अलिबाग: येथे महाराष्ट्र शासनाच्या राज्य रक्तसंक्रमण परिषद व रक्तबंध सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नवेदर नवगाव,अलिबाग येथे शनिवार (30 ऑक्टोबर)रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिराचे उद्घाटन  सामाजिक कार्यकर्ते व महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे सचिव मा. उल्हासजी वाटकरे यांच्या हस्ते झाले त्याप्रसंगी त्यांनी रक्तबंध सामाजिक संस्थैच्या पदाधिकाऱ्यांचे व महाराष्ट्र शासनाच्या राज्य रक्तसंक्रमण परिषद आधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक करून आभार मानले.

त्याप्रसंगी डॉ. महेंद्र वाटकरे ,सरकारी हॉस्पिटलचे डॉ. दीपक गोसावी व रक्तबंध संस्थेचे अध्यक्ष मा. हितेश भिवे, डॉ. राजाराम हुलवान , डॉ. दिलीप पेडवी, डॉ. विशाल चांगे , प्रियांती घातकी व शंकर वेडे  इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना  आपल्या मनोगतामध्ये रक्त दान करणे हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने किती फायद्याचे आहे, आपण जर रक्तदान केलं तर आपल्या शरीरामध्ये मध्ये लाल पेशींची वाढ होते तसेच 24 तासात आपलं रक्ताभिसरण होऊन नियमित रक्त पुरवठा सुरळीत होतो .रक्तदाब नियमित होतो,हृदयाचे आरोग्य चांगले होते,कॅन्सरचा धोका कमी होतो, रक्तदानामुळे एखाद्या व्यक्तीचा जात असलेला जीव वाचतो त्यामुळे रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे असे डॉ. महेंद्र वाटकरे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!