ताज्या घडामोडी

आता शाळेत जाणाऱ्या मुलांनाही मिळणार रेल्वेचा पास

Spread the love

लोणावळा : आता शाळेत महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना लोणावळा रेल्वे स्थानकात रेल्वेचा पास मिळण्याची सुविधा करण्यात आली आहे.

कोरोना महामारीचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे सरकारने हळूहळू शाळा आणि महाविद्यालयांना परवानगी दिली आहे. लोणावळा शहरात शिक्षणासाठी येणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तसेच लोणावळा व आसपासच्या परिसरातील विद्यार्थी पिंपरी व पुणे परिसरात शिक्षणाच्या निमित्ताने जा-ये करत असतात.

या विद्यार्थ्यांना रेल्वेचा पास मिळावा यासाठी रेल्वे प्रशासनाने विद्यार्थ्यांचे आधार कार्ड शाळा किंवा महाविद्यालयाचे बोनाफाईड सर्टिफिकेट पाहून पास देण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. रेल्वेच्या तिकीट खिडकीवर विद्यार्थ्यांना पास मिळेल अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!