ताज्या घडामोडी

देहू येथे श्री संत सेना महाराज नाभिक धर्मशाळेत उद्या होणार मुर्तींची प्राणप्रतिष्ठा

Spread the love
  • लोणावळा : देहू येथे श्री संत सेना महाराज नाभिक धर्मशाळेत उद्या (२७ ऑक्टोबर ) रोजी श्री गणपती , श्री विठ्ठल रूक्मिणी, जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संत सेना महाराज यांच्या मुर्तींची प्राणप्रतिष्ठा जनसेवक , मावळचे आमदार सुनिलआण्णा शेळके व सारिका सुनिल शेळके या दांपत्याचे हस्ते व संत तुकाराम महाराज संस्थान , देहू चे अध्यक्ष ह.भ.प.नितीन महाराज मोरे यांचे प्रमुख उपस्थितीमधे होईल.

यावेळी गुरूवर्य श्रीपाद श्रीवल्लभ माऊलीनाथ महाराज वाळुंजकर आणि हवेली पंचायत समितीचे मा.सभापती अशोक आण्णा मोरे उपस्थित राहणार आहेत.

आज दुपारी तीन ते सायंकाळी सहावाजेपर्यत श्री च्या मुर्तींची भव्य मिरवणूक झाली. मुर्तींचा जलनिवास,धान्यनिवास होईल. सायंकाळी महाप्रसाद होईल. तसेच जागर होणार आहे. ता. २७ रोजी सकाळी ७ ते १० नवग्रहपूजन, /होमहवन होईल. सकाळी साडेदहा ते अकरा मुर्तींची प्राणप्रतिष्ठा मान्यवरांचे हस्ते होईल.अकरा ते साडेआकरा कलशारोहण होईल. ११.३० वाजता मान्यवरांचे सन्मान व मनोगत होईल. तसेच साडेबारा नःतर महाप्रसाद होईल असे देहू धर्मशाळा आध्यक्ष विजयराव रसाळ , संत सेना महाराज दिंडीचे आध्यक्ष गणपतराव पवार, खजिनदार देवानंद मगर , सचिव माऊली आढाव तसेच नाभिक समाज तालुकाध्यक्ष सोपानराव कदम आणि दत्तोबा कदम यांनी सांगितले.

या कार्यक्रमास खासदार श्रीरंग आप्पा बारणे , महाराष्ट्र नाभिक महामंडळ आध्यक्ष कल्याण दळे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन घोटकुले , लोणावळ्याचे माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिर्के आदी उपस्थित राहतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!