ताज्या घडामोडी

अंमळनेरमध्ये आमदार रोहित पवार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या शिल्पाचे अनावरण

Spread the love

अमळनेर : येथे आमदार रोहित पवार यांच्या हस्ते काल श्री संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवराय यांच्या शिल्पांचे अनावरण करण्यात आले. तसेच याप्रसंगी शरदचंद्रजी पवार अभ्यासिकेचे उद्घाटन करण्यात आले.

आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 5 हजार गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप यावेळी करण्यात आले. तसेच सर्पदंशाने मृत्यू झालेल्या अमळनेर परिसरातील युवकांच्या कुटुंबाला राजमुद्रा फाउंडेशनच्या वतीने 21 हजार रुपयांची मदत देण्यात आली.

अमळनेर नगरपरिषदेच्या आरोग्य समितीचे सभापती शाम पाटील आणि राजमुद्रा फाऊंडेशन यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.

यावेळी आमदार रोहित पवार, जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, मा. आमदार साहेबराव पाटील, नगराध्यक्ष पुष्पलता पाटील, राष्ट्रवादीचे युवक जिल्हा कार्याध्यक्ष दीपक पाटील,मा. आमदार दिलीप सोनवणे, उद्योजक विनोद पाटील, जिल्हा निरीक्षक करण खलाटे, रवींद्र पाटील आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!