आमदार सुनील शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त नवलाख उंब्रेमध्ये ‘खेळ रंगला पैठणीचा’ कार्यक्रम
मावळ : तालुक्याचे आमदार सुनिल आण्णा शेळके यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आंदर मावळचे नवलाख उंब्रे नगरीचे सरपंच दत्ता आण्णा पडवळ व स्वयंभू फाउंडेशन यांच्या माध्यमातून खास महिलांसाठी खेळ रंगला पैठणीचा अर्थात होम मिनिस्टर व ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन बधलवाडी गावांमध्ये करण्यात आले.
या कार्यक्रमाला मावळचे आमदार सुनिल आण्णा शेळके, संत तुकाराम सहकारी कारखान्याचे संचालक माऊली दाभाडे, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष दीपक हुनावळे, रायगड जिल्हा महिला निरीक्षक रूपाली दाभाडे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष नारायण ठाकर ,युवा नेते अनिल मालपोटे, खरेदीविक्री संघाचे मा.अध्यक्ष बाळासाहेब भानुसघरे आदी मान्यवर उपस्थित होते
या वेळी महिलांना आकर्षक भेटवस्तू व बक्षिसे देण्यात आली. संपूर्ण कार्यक्रमाचे सादरीकरण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अभिनेत्री पूजा काळभोर यांनी केले.
ग्रामस्थ आणि स्वयंभू फाऊंडेशनच्या वतीने आमदार सुनिल आण्णा शेळके यांचा नागरी सत्कार करण्यात आला व केक कापून वाढदिवस साजरा केला.
यावेळी आमदार सुनिल आण्णा शेळके यांनी आपल्या मनोगतातून ज्याप्रमाणे मावळ तालुक्यामध्ये मी माता-भगिनी साठी जे उपक्रम राबवले कार्यामुळे माझ्या पाठीमागे माझ्या माता-भगिनी खंबीरपणे उभ्या राहिल्या त्याचप्रमाणे तुम्ही या भागामध्ये हे खास महिलांसाठी उपक्रम राबवत आहात ते अतिशय चांगले आहेत. त्यामुळे भविष्य काळामध्ये तुमचाही पाठीमागे या सर्व माता भगिनी खंबीरपणे उभे राहतील असा विश्वास आपल्या मनोगतातून व्यक्त केला. त्याच बरोबर सरपंच दत्तात्रेय आण्णा पडवळ यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या . वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले त्याबद्दल आभार व्यक्त केले .भविष्य काळामध्ये माझ्या वाड्या वस्त्यांसाठी जो विकासासाठी निधी लागेल तो कमी पडून देणार नाही अश्या भावना व्यक्त केल्या.
त्याचप्रमाणे माऊली भाऊ दाभाडे रायगड जिल्हा महिला निरीक्षक रूपाली दाभाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व आण्णांना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमासाठी बधलवाडी, मिंडेवाडी, परीटवाडी, जाधवाडी, बधालेवस्ती येथील शेकडो महिला उपस्थित होत्या. त्याचप्रमाणे सर्व जेष्ठ नागरिक सुद्धा उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन बधाले यांनी केले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक माजी सरपंच दत्तात्रय पडवळ यांनी केले. अविनाश बधाले व गुलाब बधाले यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.



