ताज्या घडामोडी
कै.दादु इंदोरीकर इंद्रायणी अंध अनाथ संस्थेच्या वतीने खेडकर परिवारास आर्थिक मदत
संगमनेर : श्री साई फ्रेन्डं सर्कल संचालीत कै. दादु इंदुरीकर इंद्रायणी अंध अनाथ संस्था इंदोरी यांच्या वतीने मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त लोककलावंत कलाभुषण रघूवीर खेडकर परीवारास २५००० हजार रुपयांची आर्थीक मदत करण्यात आली.
कोरोना महामारीच्या काळात लोककलावंताची आर्थिकघडी विस्कळीत झाली आहे. दोन वर्षापासून लाॅकडाऊनमध्ये कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. समाजातील दानशुरांनी लोककलावंतांना मदत करावी अशी अपेक्षा संस्थेच्या सर्व संचालकानी केली आहे.
या कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय चव्हाण, उपाध्यक्ष राजेंद्र मुनोत, अध्यक्ष राजेंद्र कडलक, खजीनदार सुदाम ढोरे, प्रभाकर ठाकर, संतोष मोईकर, आनंद माताळे हे सगंमनेर येथे उपस्थित होते.



