ताज्या घडामोडी

राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष दिपक मानकर यांचे निधन

Spread the love

लोणावळा : राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष दिपक रामचंद्र मानकर (वय-५६ ) यांचे गुरूवारी (ता.१४) रोजी दुपारी दोन वाजता निधन झाले. त्यांचे पश्चात पत्नी सपना,  कपील मानकर , मुलगी खुशी मानकर ,  भाऊ , भावजय , पुतने असा परिवार आहे.

पञकार गोपी मानकर हे त्यांचे लहान भाऊ होत.कै.मानकर यांचे पार्थिवावर कैलासनगर स्मशानभूमित शोकाकूल वातावरणात गुरूवारी राञी अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाप्पू आण्णा भेगडे आणि लोणावळ्याचे नगरसेवक काँग्रेस आयचे प्रदेश सचिव निखिल कविश्वर यांनी श्रध्दांजली वाहिली.

कै.दिपक मानकर हे आपल्या केसांच्या स्टाईलमुळे शाहरूख म्हणून सर्वपरिचित होते. रोहिदास वाडा ,गावठाण येथील मानाचा तिसरा गणपती संत रोहिदास तरूण मंडळ व संत रोहिदास नवराञौत्सव मंडळाचे ते आधारस्तंब होते. ते काही वर्षे पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष होते. राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार व उपमुख्यमंञी आजितदादा पवार यांचे निकटचे संबंध आसल्याने कै.मानकर यांना मंञालयात स्वतंत्र केबीन व वाहन देण्यात आले होते.

आज माजी खासदार आशोकराव मोहोळ यांनी सपत्निक कै.मानकर यांचे घरी भेटून कुटूंबातील सदस्यांचे सांत्वन केले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष प्रमोद गायकवाड , सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार वाळंज आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!