कोजागिरीला सेवाधाम वाचनालयाच्या प्रांगणात बहरणार रंगतदार संगीत मैफल
तळेगाव : येथील सेवाधाम ट्रस्ट मोफत वाचनालयाच्या प्रांगणात यावर्षी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त मंगळवार (19 ऑक्टोबर) रोजी ‘उगवला चंद्र आरोग्याचा’ या बहारदार संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील रसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रंथालयाचे अध्यक्ष सुरेश धोत्रे व सचिव डॉ. वर्षा वाढोकर यांनी केले आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मावळ शाखेच्या सहकार्याने हा कार्यक्रम होणार आहे.
सायंकाळी 6:30 वाजता ‘उगवला चंद्र आरोग्याचा’ या कार्यक्रमात पंडित विनोद भूषण अल्पे, प्रकाशराव जोशी, श्रुती देशपांडे, सिद्धि परदेशी, डॉ. मधुरा निकम, संपदा थिटे व सुरेश साखवळकर हे गायक कलाकार सहभागी होणार आहेत.
या मैफिलीत चंद्र पौर्णिमेचा शोभतो गगनी, राम रंगी रंगले, विठ्ठल किती घ्यावा, राजस सुकुमार, हरी म्हणा कुणी गोविंद म्हणा, गर्द सभोती रान साजणी, कानडा राजा पंढरीचा, रुपेरी वाळूत, नारायणा रमा रमणा, खेळ मांडीयेला,उगवला चंद्र पुनवेचा, पद्मनाभा नारायणा, हे सुरांनो चंद्र व्हा, विठ्ठल विठ्ठल गजरी आधी गीतांचे सादरीकरण होणार आहे.
ऑर्गन वर संजय गोगरे तर तबला केदार कुलकर्णी हे कार्यक्रमात साथ-संगत करतील. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सृजन नृत्यालयाच्या संचालिका मीनल कुलकर्णी करणार आहेत. कार्यक्रमानंतर सर्वांसाठी दुग्ध पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सदर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आवाज न्यूज फेसबुक पेजवर करण्यात येणार आहे.



