ताज्या घडामोडी

शहर राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविकांच्या आढावा बैठकीत पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता स्थापनेचा निर्धार

Spread the love

चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या माजी नगरसेविकांची आढावा बैठक निगडी येथील कृष्णा हॉटेलमध्ये संपन्न झाली. या बैठकीत आगामी महापालिका निवडणूकीत शहरात सत्ता स्थापन करण्याचा निर्धार करण्यात आला.

येत्या काही महिन्यात पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक तीन सदस्यीय पद्धतीने होणार आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस तयारीला लागली असल्याचे चित्र आहे.

या बैठकीला पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सूरेखा लांडगे, माजी स्थायी समिती अध्यक्ष शमीम पठाण, माजी उपमहापौर मंगला जाधव, माजी नगरसेविका मनीषा पवार, स्मिता कुलकर्णी ,रमा ओव्हाळ, उषा गजभार, सुमन नेटके, संध्या गायकवाड, अमीना पानसरे ,आशा सुर्यवंशी उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!