ताज्या घडामोडी

नगरसेवक संतोष भेगडे घडवणार 1100 महिलांना कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मीचे दर्शन

दिव्यांगबांधवांसाठी केली विशेष सोय

Spread the love

तळेगाव : नगरसेवक संतोष भेगडे यांच्या पुढाकारातून 1100 महिलांना नवरात्रोत्सवानिमित्त कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मीचे दर्शन मिळणार आहे.

अनेक महिन्यांपासून बंद असलेली मंदिरे घटस्थापनेच्या मुहूर्तावर भाविकांसाठी खुली झाली आहेत. त्या निमित्ताने भेगडे यांनी मावळ तालुक्यातील व तळेगावातील 1100 महिला आणि दिव्यांग बांधवांसह महालक्ष्मी दर्शनासाठी आज (10 ऑक्टोबर )रोजी कोल्हापूरकडे प्रस्थान केले.

आज सकाळी 7 च्या सुमारास मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून 24 बसगाड्या कोल्हापूरकडे रवाना झाल्या. प्रत्येकाला मास्क व सॅनिटायझर देण्यात आले असून नाष्टा, जेवणासह देव दर्शनाच्या ऑनलाईन बुकिंगची पूर्ण तयारी करण्यात आली आहे.

दरवर्षी देवदर्शन सहलीचे आयोजन केले जाते. परंतु गेल्या जवळपास दीड वर्षापासून बंद असलेली मंदिरे घटस्थापनेच्या मुहूर्तावर खुली झाल्याने माता भगिनींच्या आग्रहास्तव मोठ्या प्रमाणात देव दर्शनाचे आयोजन केल्याचे नगरसेवक संतोष भेगडे म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!