ताज्या घडामोडी

आई एकवीरा देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी

Spread the love

कार्ला : महाराष्ट्राचे श्रद्धास्थान कोळी-आगरी बांधवांची  कुलस्वामिनी आई एकवीरा देवीचे दर्शन घेण्यासाठी आज रविवार (दि. 10 ऑक्‍टोबर) रोजी लाखो भाविकांनी गर्दी केली होती.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जवळपास दीड वर्षापासून देवीचे मंदिर बंद होते. घटस्थापनेच्या मुहूर्तावर मंदिराचे दरवाजे दर्शनासाठी खुले करण्यात आले. त्यामुळे आज साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.यावेळी कोरोनाचे नियम अक्षरशः पायदळी तुडवण्यात आले.सोशल डिस्टसिंगचा फज्जा व मास्कचा भाविकांना विसर पडला होता.

महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा-

कार्ला परिसरात लाखो भाविकांनी गर्दी केल्याने परिसरामध्ये व मुंबई – पुणे राष्ट्रीय महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!