ताज्या घडामोडी

आई श्री एकविरा देवीच्या मंदिरात व खंडाळ्यातील श्री वाघजाई देवी मंदिरात विधिवत घटस्थापना ; भाविक भक्तांमधे उत्साह

Spread the love

लोणावळा : आई श्री एकविरा देवीच्या मंदिरात व खंडाळातील श्री वाघजाई देवी मंदिरात विधिवत घटस्थापना  करण्यात आली. भाविक भक्तांमधे अत्यंत उत्साहाचे वातावरण आहे.

मुखदर्शन घेवून भाविक भक्तांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याने गर्दीवर नियंत्रण राहिलेले पहायला मिळाले. तमाम महाराष्ट्रातील कोळीबांधव , आगरी कोळी , तसेच , मुख्यमंत्री श्री उध्वव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कुलदैवत असलेल्या कार्लाच्या श्री एकविरा देवीच्या मंदिरात घटस्थापनेनिमित्त मोगरा व विविध फुलांची सजावट तसेच विद्युत रोषणाई केल्यामुळे घटस्थापना उत्साहाने देवीचे पुजारी ,विश्वस्त आणि भाविक भक्तांचे उपस्थितीमधे संपन्न झाली.

यानंतर आरती झाली. पहाटेपासूनच देवीचा गाभारा कार्यक्रम आसल्याने गजबजून गेला होता.देवीचा ,अभिषेक, पूजा , सप्तशतीचा पाठ वाचन आणि घटस्थापना तसेच आरती व दर्शनास रांगा असा मंदीरातील घटस्थापना कार्यक्रम संपन्न झाला. देवीच्या पायथा मंदिरात व पाचपायरी मंदिरातही घटस्थापना झाली.

वाघजाई मंदिरात खंडाळातील घाटमाथ्यावर घटस्थापना कार्यक्रम श्री वाघजाई देवीचे ट्रस्ट चे अध्यक्ष चंद्रकांत लांघे आणि सेक्रेटरी श्री सिताराम कचरे ( पाटील ) यांचेसह पुजारी व विश्वस्त यांचे उपस्थितीमधे साधेपणाने संपन्न झाला. मुख दर्शनास फक्त परवानगी असून कोणतेही सभा वा कार्यक्रम करण्याचे तसेच दुकानदारांना , हाॕटेलचालक यांना खेळणीवाले यांना मनाई आहे. गर्दी कमी राहिली. गाभाऱ्यात न जावू देता मुखदर्शन असल्यामुळे भाविक भक्तांमधे नाराजी असली तरी कोविडचे पार्श्वभूमीवर शासनाचे आदेश ट्रस्टने पाळल्याचे दिसले. लोणावळ्याच्या परिसरात अनेक ठिकाणी व मंडळांनी देवीची साधेपणाने पूजा व प्रतिष्ठापना केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!