ताज्या घडामोडी
ऐरोलीतील एकविरा भक्ताने कुटुंबियांसह केली गडाची स्वच्छता
कार्ला : नवी मुंबई येथे राहणारा एकवीरा देवीचा भक्त गेल्या पंचवीस वर्षापासून नवरात्रौत्सव काळात एकवीरा देवीच्या गडाची स्वच्छता आपल्या कुटुंबीयांसह करत आहे.
राजेंद्र आत्माराम मढवी आपल्या कुटुंबीयांसमवेत गडावरील कचरा गोळा करून तो नष्ट करणे, गवत काढणे, पाय-या स्वच्छ धूवणे अशी सेवा करत आहे. भक्ती अनेक रुपात करता येते. मढवी कुटुंबीय स्वच्छतेच्या रुपाने भक्तिमार्ग जोपासत आहेत.



