ताज्या घडामोडी

जेष्ठ साहित्यिक, कथाकार, उत्तम वक्ता,विनोदी लेखक,पटकथाकार द. मा. मिरासदार यांना भावपूर्ण श्रध्दांजली – सुरेश धोत्रे

Spread the love

तळेगाव : ज्येष्ठ साहित्यिक, विनोदी लेखक, द. मा. मिरासदार यांचे वयाच्या 94 व्या वर्षी निधन झाले. यावेळी त्यांच्या आठवणी जागवताना द. मा. मिरासदार यांच्या कथाकथनाचे , आपल्या तळेगाव दाभाडे तसेच मावळ तालुक्यात अनेक कार्यक्रम अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या तळेगाव शाखेच्या वतीने मी आयोजित केले होते याची आठवण आजही रसिक काढतात असे धोत्रे म्हणाले.

अखिल भारतीय नाट्य परिषदेचे तळेगाव दाभाडेचे अध्यक्ष नात्याने माणूस म्हणून माझे आणि द. मा. मिरासदार यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे आणि मायेचे संबंध होते. द. मा. मिरासदार यांच्या जाण्याने साहित्य आणि संस्कृती याची आणि आपली कधीही न भरुन येणारी व्यक्तीगत हानी झाली आहे. अनेकदा ते घरी ही प्रेमाने आले होते. असे उद्गार धोत्रे यांनी श्रद्धांजली वाहताना काढले.

माणूसपण त्यांनी नेहमी जपले त्यामुळेच द. मा .मिरासदार यांच्यातला आतला माणूस हा नेहमीच मोठा होता.अशा या अवलिया कलाकाराला, लेखकाला, महान माणसाला माझा मानाचा मुजरा
तसेच त्यांच्या नुकत्याच झालेल्या निधनाबद्दल द. मा. मिरासदार काकांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली या शब्दात  अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव दाभाडे शाखेचे अध्यक्ष  सुरेश धोत्रे यांनी श्रद्धांजली वाहिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!