ताज्या घडामोडी

लोकसंपर्क असलेला नेता म्हणून लंके यांची ओळख – जयंत पाटील

Spread the love

अहमदनगर : लोकसंपर्क असलेला नेता म्हणून आमदार लंके यांची ओळख झाली असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले.

अहमदनगर जिल्ह्यात विधान परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी संवाद यात्रेसाठी जयंत पाटील अहमदनगर जिल्ह्यात आले होते.

यावेळी पारनेर मधील आढावा बैठकीत जयंत पाटील यांनी आमदार लंके यांच्या कोविड काळातील कामाचे कौतुक केले.

या बैठकीला आमदार निलेश लंके, महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!