ताज्या घडामोडी
चौराई डोंगरावरील अनधिकृत बांधकामावर वनविभागाची कारवाई
तळेगाव : सोमाटणे येथील चौराई डोंगरावरील अतिक्रमणावर वन विभागाने कारवाई केली आहे. या अतिक्रमणावर हातोडा मारून वन विभागाने बांधकाम भुईसपाट केले आहे.
फ्रेंण्डस ऑफ नेचर या संस्थेने या अनधिकृत बांधकामाविरोधात तक्रार केली होती.
या तक्रारीची दखल घेत वडगाव मावळचे वनपरिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव, सुशील मंतावार, तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशनचे उपपोलीस निरीक्षक दत्तात्रय मोहिते, फ्रेंड्स ऑफ नेचरचे संस्थापक महेश महाजन, निरज शाही, किरण मोकाशी व कार्यकर्ते तसेच पोलीस, वनपाल, वनरक्षक यांनी पहाटे 3 च्या सुमारास या बांधकामावर कारवाई केली.



