ताज्या घडामोडी

माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिर

Spread the love

तळेगाव: शिक्षण महर्षी व माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त आज एमआयडीसीमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

एमआयडीसीमधील मास्क पॉलीमर्स या कंपनीमध्ये मायमर संस्था संचालित गरवारे ब्लड बँक यांच्या सहकार्याने हे शिबीर घेण्यात आले.या शिबिरात मास्क पाॅलिमर, मानस ऑटोमोटीव्ह व अन्य सलग्न कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने ६० युनिट रक्तदान करण्यात आले.

शिबिराचे उद्घाटन माजी राज्यमंत्री संजय भेगडे व इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांच्या हस्ते करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!