ताज्या घडामोडी

बनावट गुटखा तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त

Spread the love

वडगाव : येथील वडगाव मावळ हद्दीत बनावट गुटखा तयार करणाऱ्या एका कारखान्यावर वडगाव पोलिसांनी छापा टाकून कच्चामाल, यंत्रसामग्री, मोटारगाडी असा एकूण 11 लाख 98 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे.

श्रिकांत बाळू चांदेकर (वय 32) रा. ढोरेवाडा वडगाव मावळ असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस नाईक अमोल तावरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सह त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने नऊ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार फिडेक्स कंपनीच्या मागे एका पत्र्याच्या शेडमध्ये राज्य सरकारने बंदी घातलेले तंबाखूजन्य गुटका पदार्थ बनवून त्याचा साठा व विक्री करताना आरोपी आढळून आला. रविवारी संध्याकाळी येथे छापा टाकून पोलिसांनी कारवाई केली.आरोपी सह मुद्देमाल ताब्यात घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!