ताज्या घडामोडी

डोळसनाथ मंदिर ओढ्याजवळ नवीन सार्वजनिक शौचालय बांधावे – नगरसेवक संतोष भेगडे

Spread the love

तळेगाव : येथील प्रभाग क्रमांक 11 मधील डोळसनाथ मंदिर ओढ्याजवळ नवीन सार्वजनिक शौचालय बांधण्यात यावे अशी मागणी नगरसेवक संतोष भेगडे यांनी नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ओढ्याजवळील सार्वजनिक शौचालयाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. सांडपाणी रस्त्यावर येत आहे. तसेच शौचालयाचे स्लॅब व दरवाजे तुटलेले आहेत. तरी या ठिकाणी नवीन शौचालय बांधावे असे निवेदनात म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!