ताज्या घडामोडी

स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्यावतीने तालुक्यातील विविध मागण्यासाठी पंचायत समितीच्या गटविकास अधिका-यांना निवेदन

Spread the love

मावळ : स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना तालुक्यातील विविध मागण्या संदर्भात निवेदन देण्यात आले.

मावळ तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना पंधरा टक्के अनुदान दरवर्षी खर्च झाला पाहिजे. दलित वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे निधी अभावी खोळंबली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना विकासापासून वंचित राहावे लागते. त्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांनी सर्व ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांची मीटिंग बोलावून त्यांना त्या पद्धतीच्या सूचना द्याव्यात. दलित, आदिवासी लाभार्थ्यांना त्यांचा  लाभ मिळावा या सूचना निवेदनात करण्यात आल्या आहेत.

यावेळी  संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक केंद्रीय सदस्य बाळासाहेब गायकवाड, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे मावळ तालुका अध्यक्ष बबनराव ओव्हाळ , युवक सरचिटणीस मा. उपसरपंच कुणाल ओहाळ, आंदर मावळ मा. युवक अध्यक्ष रविंद्र पवार ,भारतीय बौद्ध महासभा महासचिव रवी भाऊ भवार ,नाणे मावळ कोषाध्यक्ष विजय साबळे, नाणे मावळ कार्याध्यक्ष विलास गायकवाड , आंदर मावळ युवक अध्यक्ष शिवाजी ओव्हाळ, युवा कार्यकर्ते रोहित भवार उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!