ताज्या घडामोडी

कठड्याला धडकून तरुणाचा मृत्यू

Spread the love

कामशेत : जुन्या मुंबई पुणे महामार्गावर पाथरगाव मध्ये दुचाकीस्वाराचा दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने पुलाच्या कठड्याला धडकून त्याचा अपघातात जागीच मृत्यू झाला.

नामदेव महादेव पवार (वय ५२ रा. सत्यवाननगर, नवी मुंबई) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

कामशेत पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, गुरुवार (दि. २४) रोजी सकाळी ५ वाजण्याच्या सुमारास जुन्या मुंबई पुणे महामार्गावर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीचा (एमएच ४३ बीजे ०७४५) नियंत्रण सुटून चालक कामशेत पाथरगाव पुढे असणाऱ्या पुलाच्या कठड्यावर दुचाकी जोरात आदळून दुचाकीस्वाराचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला.

याप्रकरणी पोलीस हवालदार हनुमंत वाघमारे पुढील तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!