ताज्या घडामोडी

मावळ : प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी दिपककुमार मेमाणे बिनविरोध

Spread the love

मावळ : तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी गुणवंत शिक्षक दिपककुमार मेमाणे यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली.

अध्यासी अधिकारी आर. बी. बनाईत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या सभेत मेमाने यांची एकमताने निवड करण्यात आली. मेमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाचाणे ता. मावळ येथे उपशिक्षक असून देहुगावचे रहिवासी आहेत. त्यांना यापूर्वी पंचायत समिती, मावळ  व तालुक्यातील विविध सामाजिक संस्थांनी गुणवंत शिक्षक म्हणून गौरविलेले आहे.

पतसंस्था अधिकाधिक कार्यक्षम बनवण्यासाठी प्रयत्न करणार असून शिक्षक सभासदांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे  मेमाणे यांनी यावेळी सांगितले

संस्थेचे सुमारे आज अखेर ७२३ सभासद असून सुमारे १३ कोटींचे भागभांडवल आहे .६ कोटी १९ लाख रुपयांच्या मुदत ठेवी तसेच संस्थेने २६ कोटी कर्ज वाटप केले आहे. संस्थेची वार्षिक उलाढाल सुमारे ३५ कोटी रुपये आहे.

या प्रसंगी शिक्षक नेत्या श्रीमती शोभा वहिले, सुहास विटे, बाबासाहेब औटी, शिक्षक संघटनेचे अध्यक्ष नारायण कांबळे, संदीप औटी, बाळासाहेब शिंगाडे, अनिल कळसकर, प्रमोद भोईर, राहूल जाधव, राहूल लंबाते, अण्णासाहेब ओहोळ, दत्तात्रय भालेराव, अजित मोरे, विष्णू मोरे, आदि शिक्षक उपस्थित होते.संस्थेचे संचालक प्रमोद भोईर यांनी सूत्रसंचालन केले व जेष्ठ संचालक अनिल कळस्कर यांनी आभार मानले

.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!