ताज्या घडामोडी

ज्येष्ठनागरिक मित्रमंडळ संपादित वाटचाल- या पुस्तकाच प्रकाशन आणि कृतज्ञता सोहळा दिमाखात संपन्न!

तिसाव्या वर्षात यशस्वीपणे पदार्पण करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक मित्रमंडळ कार्यकारणीचा कार्यकाळ या महिन्यात निरोप घेत आहे...

Spread the love

ज्येष्ठनागरिक मित्रमंडळ संपादित वाटचाल- या पुस्तकाच प्रकाशन आणि कृतज्ञता सोहळा दिमाखात संपन्न!Jyeshtanagari Mitramandal Edited Watchal – The publication of this book and the gratitude ceremony concluded in Dimakh!

आवाजन्यूज: तळेगाव दाभाडे, वार्ताहर ११ मार्च.

वाटचाल या पुस्तकाच प्रकाशन आणि कार्यकारणीच्या सदस्यांना बिनविरोध निवडून सेवेची संधी दिल्याबद्दल- मंडळाच्या सर्व सन्माननीय सभासदांविषयी कृतीज्ञता व्यक्त करण्याचा हा अतिशय संवेदनशील सोहळा आज संपन्न झाला.

 

मंडळाचे अत्यंत संयमी कर्तव्यदक्ष अध्यक्ष. सुधाकर रेम्बोटकर यांनी उपस्थितांच मनःपूर्वक स्वागत केलं. माझ्या अध्यक्षीय काळात माझ्या सहकाऱ्यांनी सर्वतोपरी मला सहाय्य केल्यामुळेच मी मंडळासाठी काहीतरी करू शकलो यासाठी मी सर्वांचा ऋणी आहे. या शब्दात अध्यक्षांनी आपलं मनोगत व्यक्त केलं.कार्यवाह. गीता वालावलकर यांनी मागील सभेचा वृत्तांत योग्य शब्दात सादर केल्यानंतर त्यांनीही आपल्याला कार्यकारणीच्या सर्व सदस्यांनी त्यांना केलेल्या सहकार्याबद्दल आपलीही कृतज्ञता आपल्या मनोगतात व्यक्त केली.

समारंभाचे प्रमुख पाहुणे -ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य सुरेश अत्रेसरांचा  विठ्ठल कांबळे यांनी परिचय करून दिल्यानंतर अत्रे सरांचा मंडळातर्फे यथोचित सत्कार करण्यात आला!प्रमुखपाहुणे ज्येष्ठ लेखक कवी प्राचार्य सुरेश अत्रेसर तसेच कार्यकारणी सदस्यांच्या शुभहस्ते- वाटचाल या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आनंददायी प्रसन्न वातावरणात संपन्न झाला! अंतर्गत लेखपाल सैंदांण शिव- उत्कृष्ट मुखपृष्ठाची निर्मिती करणारे दिनेश फल्ले यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.

तसेच उत्तम छपाई आणि पुस्तकाची आखीव रेखीव बांधणी करणारे प्रिंटर  अर्जुन आणि चिरंजीव अक्षय गायकवाड या उभयतांचाही शाल श्रीफळ देऊन मंडळातर्फे सत्कार करण्यात आला! शिवजयंती निमित्त छत्रपतींच्या आयुष्यातील अनेक रोमांचकारी प्रसंगाच वर्णन अत्रे सरांनी आपल्या भारदस्त आवाजात सभागृहाला सादर केले. त्यानंतर ज्येष्ठत्वाचा उत्सव साजरा करण्याचा गुरुमंत्रही अत्रे सरांनी स्वरचित काव्यातून सादर करून- सभागृहाला मंत्रमुग्ध केले. निरोप घेताना वाईट वाटेल! दुःख अंतरी दाटेल! हे सार पुन्हा कधी जमणार?

या सर्व आठवणी मात्र मनात जतन करून ठेवणार. याच भावनेतून आपल मनोगत व्यक्त करताना संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर शालिग्राम भंडारी यांनी कार्यकारिणीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांच्या स्वभावाच यथार्थ वर्णन आपल्या विशिष्ट शैलीत सभागृहासमोर सादर केलं! त्यामुळे संपूर्ण सभागृह आनंदाचे डोही आनंद तरंग अनुभवण्याचा धनी ठरला. अशोक काळोखे यांनीही या समारंभाला शुभेच्छा दिल्यानंतर आगामी निवडणूक बिनविरोध व्हावी– अशी भावना पुढे आपल्या मनोगतात व्यक्त केली. भाग्यश्री देशमुख यांनी सादर केले आभार प्रदर्शन आणि सामूहिक प्रार्थना झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!