ताज्या घडामोडी

तळेगाव दाभाडे येथील स्वयंभू खडकेश्वर मित्र मंडळ तर्फे महाशिवरात्री उत्साहात साजरी.

हजारो भक्तांनी घेतले महादेवाचे दर्शन..

Spread the love

तळेगाव दाभाडे येथील स्वयंभू खडकेश्वर मित्र मंडळ तर्फे महाशिवरात्री उत्साहात साजरी.हजारो भक्तांनी घेतले महादेवाचे दर्शन..

आवाज न्यूज तळेगाव दाभाडे वार्ताहर, १९ फेब्रुवारी.

स्वयंभू खडकेश्वर मित्र मंडळ तर्फे महाशिवरात्री उत्साहात साजरी.हजारो भक्तांनी घेतले महादेवाचे दर्शन.. रणजित सिंह कॉलनी, तळ्याकाठी वसलेले स्वयंभू खडकेश्वर मंदिर आहे. येथे दरवर्षी शिवरात्रीच्या दिवशी अभिषेक व पूजा केली जाते, तसेच हजारो भावी भक्त दर्शन घेण्यासाठी येत असतात रणजीत सिंग कॉलनी येथे असलेल्या मंदिरात पूजा करण्यासाठी एकच गर्दी  झालेली होती. रोजची महादेवाची पुजा सचिन लांघे करत असतात.

हर हर महादेव गजरात संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते. रात्री स्वयंभू खडकेश्वर मंदिरामध्ये भजनाचा कार्यक्रम पार पडला.मंदिर परिसरात नागरिकांना बसण्यासाठी मंडपाची व्यवस्था करण्यात आली होती. व फेमस मंडप व डेकोरेटने आकर्षक अशी विद्युत रोषणाई केली होती.

 

वर्षानुवर्षाची परंपरा जपत याही वर्षी भव्य भंडाऱ्याचे आयोजन केले होते.  परिसरातील सर्व भाविक भक्तांनी त्याचा लाभ घेतला.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी ,अमर खङकेश्वर मित्र मंडळ, आझाद मित्र मंङळ, शिवराष्ट्र मित्र मंडळ,जय बजरंग मित्र मंडळ,भोई समाज मित्र मंडळ, च्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.अशी माहिती मंडळाचे  अध्यक्ष  अविनाश गुलाब भेगङे यांनी आवाज न्यूजला दिली.

पाहुयात व्हिडिओ.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!