ताज्या घडामोडी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत शिवसेनेचा महापौर हाच निर्धार- संजय राऊत

Spread the love

चिंचवड : पंचावन्न आमदार असताना जर राज्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकतात तर पिंपरी-चिंचवड मध्ये पन्नास नगरसेवक निवडून आल्यास शिवसेनेचा महापौर का होणार नाही असा ठाम निर्धार शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

यावेळी सत्ताधारी भाजपवर टीकास्त्र सोडत, शहर शिवसेनेत कोणतीही गटबाजी नाही असे सांगत, येत्या निवडणुकीत ५० नगरसेवक निवडून आणण्याचे आमचे लक्ष आहे असे ते म्हणाले.

आगामी पिंपरी – चिंचवड महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी झालेल्या पिंपरी,चिंचवड व भोसरी या तीनही मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यासाठी शिवसेना नेते पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख खासदार संजय राऊत आज पिंपरी-चिंचवडमध्ये आले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!