ताज्या घडामोडी

तळेगाव दाभाडे येथील नालबंद गल्ली येथे रस्त्यावरून जाणाऱ्या एका मुलाला घोणस बाईट झाली.

सदर रुग्णावर ससून हॉस्पिटल येथे उपचार चालू असून पेशंटला कोणताही धोका नाही..

Spread the love

तळेगाव दाभाडे येथील नालबंद गल्ली येथे रस्त्यावरून जाणाऱ्या एका मुलाला घोणस बाईट झाली.

आवाज न्यूज: 30 ऑगष्ट. जवळच उपस्थित असणारे सतीश राठोड, तेजस जवेरी, प्रशांत शेडे, दीपक नळे यांनी त्वरीत अँम्बुलन्स बोलावत त्याला जवळ असणाऱ्या हॉस्पीटल येथे        यश महेंद्र जोगद॔डेला ,दुसऱ्या हॉस्पीटल येथे नेण्यास सांगीतले.

एका दवाखान्यात साधारण एक दीड तास वेळ घेऊनही तेथे कोणतीही प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने तेथील डॉक्टरने सुद्धा त्याला वाय सी एम हॉस्पिटल येथे नेण्यात सांगितले मात्र साधारण दोन तास होऊन इतर काही लक्षणे दिसू लागल्याने याला, वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश गराडे यांनी सापांच्या विषा वर प्रभावी असणारी गोळी त्याला दिल्याने पुढील तीन-चार तास त्याला कोणताही धोका नव्हता मात्र तरीही लवकर उपचार न मिळाल्याने त्याला उलटी व इतर त्रास होत असताना त्याला वाय सी एम हॉस्पिटल येथे नेण्यात आले.

त्या पेशंटला नेण्यासाठी ॲम्बुलन्स ची सुविधा होत नव्हती   सुदाम शेळके यांना फोन केला असता, त्यांनी तात्काळ ॲम्बुलन्स उपलब्ध करून दिल्याने त्या रुग्णाचे प्राण वाचले आहे.

गणेश निसाळ, गणेश ढोरे ,निलेश गराडे यांनी तेथील डॉक्टरांची भेट घेत त्या व्यक्तीला तात्काळ ऍडमिट करण्याविषयी सांगितले.
सध्या सदर रुग्णावर ससून हॉस्पिटल येथे जोगदंडेवर उपचार चालू असून पेशंटला कोणताही धोका नाही अशी माहिती मिळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!