ताज्या घडामोडी

चासकमान कॅनॉलवर बसविलेल्या इलेक्ट्रीक मोटर चोरी करणारे दोघे गजाआड.

त्यांचेकडून ५ इलेक्ट्रीक मोटार व एक मोटारसायकल जप्त..

Spread the love

 

 आवाज न्यूज: चासकमान कॅनॉलवर बसविलेल्या इलेक्ट्रीक मोटर चोरी करणारे दोघे गजाआड. त्यांचेकडून ५ इलेक्ट्रीक मोटार व एक मोटारसायकल जप्त..

दिनांक २१/०८/२०२२ रोजी १८/०० वा. ते दिनांक २२/०८/२०२२ रोजी ०६.०० वा. चे दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने मौजे कडधे ता.खेड जि.पुणे येथे गोठ्याचे उघडया दरवाजातून प्रवेश करून गोठ्यामधील एक पिवळसर रंगाची कॉम्पटन कंपनीची ५ एव.पी पाण्याची विजेवर चालणारी मोटार चोरून नेली आहे.

त्याबाबत खेड पोलीस स्टेशन ५३९/२०२२ भा.द.वि. कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला
सदर गुन्हयाचा तपास चालू होता. दिनांक २२/०८/२०२२ रोजी १६:०० वा. चे सुमारास पोलीस नाईक सचिन जतकर, पोलीस अंमलदार निखील गिरीगोसावी, स्वप्नील गाढवे असे चोरीच्या गुन्हयाचे अनुशंगाने कडधे गावचे हद्दीत खेड ते वाडा जाणारे रोडवर कडधे कॉलनीजवळ एक काळे रंगाचे पॅशन मोटारसायकलवर दोन इसम हे खेड बाजूकडे गाडीचे मध्यभागी पोत्यामध्ये काहीतरी भरून संशयीतरीत्या जाताना दिसले. त्यांना पकडून नाव पत्ता विचारले असता त्याचे नाव त्यांनी कैलास मारूती गावडे वय २१ वर्षे रा. खंडोबामाळ, कडधे ता. खेड जि.पुणे, २) दिलीप तुकाराम केदारी वय २४ वर्षे रा. खंडोबामाळ, कडधे ता.खेड जि.पुणे असे असल्याचे सांगीतले.

त्यांचेकडे त्यांचे गाडीचे सिटवर मध्यभागी ठेवलेले पोते उघडून पाहीले असता त्यामध्ये एक पाण्यातील चोरीस गेलेली इलेक्ट्रीक मोटार मिळून आली ती मोटार त्यांनी कडधे येथून एका गोठयातून चोरी केली असल्याची कबूली दिली असून वर नमुद वर्णनाची आरोपीचे ताब्यात मिळून आलेली विजेवर चालणारी पाण्याची मोटर व एक काळे रंगाची हिरो कंपनीची पॅशन प्रो गाडी नंबर एम. एच. १४. ई. जे. ५७२४ मिळून आले असून सदरची मोटारे व पॅशन प्रो मोटारसायकल जप्त करण्यात आली असून त्यांची रिमांड घेवून त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी आणखी बुटटेवाडी येथील कॅनॉलवरील ४ इलेक्ट्रीक मोटरी चोरी केली असल्याची कबूली दिली असून त्यांचेकडून कडधे व बुटटेवाडी येथील एकूण ५ मोटरी व एका मोटारसायकलसह एकूण ७५,०००/- (पंचाहत्तर हजार) रु. किं.चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहेत.

सदरची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख सो, मा. अपर पोलीस अधिक्षक मितेश गट्टे साो, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील साो, मा. पोलीस निरीक्षक सतिशकुमार गुरव सो, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस भारत भोसले तसेच पो.हवा. संतोष घोलप, पो.ना. सचिन जतकर, पोलीस अंमलदार निखील गिरीगोसावी, स्वप्नील गाढवे, पो.ना.शेखर भोईर, सागर शिंगाडे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!