ताज्या घडामोडी

पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी महिला शहराध्यक्षपदी सारिका पवार यांची निवड

Spread the love

पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओ बी सी महिला शहराध्यक्ष पदी सारिका पवार यांची निवड करण्यात आली.
आज पुणे येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी महिला शहराध्यक्ष पदी सारिका पवार यांना निवडीचे पत्र देऊन त्याचे स्वागत करण्यात आले.त्यांनी काही दिवसांपूर्वी भाजपाचा राजीनामा देऊन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जेष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या उपस्थित राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला होता.शहरात प्रत्येक बूथ वर पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे ह्या वेळी त्यांनी सांगितले.Advt.
सदर कार्यक्रमासाठी पि चि शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक संजय वाबळे ,प्रसिध्द गायक आनंद शिंदे, सरचिटणीस राष्ट्रवादी युवक योगेश मोरे हरिप्रसाद वाबळे , प्रशांत बडगुजर , दीपक चव्हाण, महेंद्र पवार, अनिकेत उबाळे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!