आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सोलापुरातील जिल्हा परिषदेच्या माजी मुख्याध्यापिका सुनीता भगवान साबळे यांना उमाई सामाजिक बहुउद्देशीय संस्था व काष्ट्राईब शिक्षक संघटने तर्फे, आयोजित कार्यक्रमात आदर्श माता पुरस्कार देऊन सन्मानित…..!

Spread the love

सोलापूर:- सोलापुरातील सामाजिक कार्यकर्त्या आणि जिल्हा परिषदेच्या माजी मुख्याध्यापिका सुनीता भगवान साबळे यांना आदर्श माता म्हणून पुरस्काराने गौरविण्यात आले. उमाई सामाजिक बहुउद्देशीय संस्था व काष्ट्राईब शिक्षक संघटने तर्फे, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आदर्श माता -पिता पुरस्कार आयोजित कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते दत्ता गायकवाड व इंगळगी साहेब विस्तार अधिकारी यांचे कडून सुनीता साबळे यांना आदर्श माता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

अत्यंत प्रतिकूल आणि हलाखीच्या परिस्थितीत सुनिता साबळे यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांचे पती बुद्धवासी भगवान साबळे हे भारतीय सैन्यात कार्यरत होते.त्यानंतर पोलीस दलात ड्रायव्हर म्हणून सेवा केली.त्यांनी त्यांच्या मुलांना चांगल्या प्रकारचे शिक्षण दिले.आज त्यांची ज्येष्ठ कन्या रेखा खळसोडे जिल्हा परिषदेच्या शिक्षिका म्हणून सेवा देत आहेत.तर डॉ.अलका सोरटे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध स्त्री संमोहनतज्ञ म्हणून तणावमुक्त उपचार करीत आहेत त्यांचे सुपुत्र संतोषसाबळे हे सोलापूर शहर पोलीस दलात कार्यरत आहेत.तसेच सर्वात लहान कन्या ज्योती शिंदे या डॉक्टर आहेत.सुनीता साबळे यांनी दिलेल्या संस्काराने सर्वजण कार्यरत आहेत. त्यांना आदर्श माता म्हणून पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia