आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*नांदेडचा भूमिपुत्र सौरभ कोंडेकर याचे युपीएससी परिक्षेत उज्वल यश*.

Spread the love

नांदेड:- (सखाराम कुलकर्णी)नांदेड येथील भूमिपुत्र व ऍड शैलेश कोंडेकर यांचे जेष्ठ चिरंजीव सौरभ याने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन याची सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर, या सुपर क्लास वन पदासाठी निवड झाली आहे.

नुकताच लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल लागला असून घेण्यात आलेल्या परीक्षे मध्ये नांदेड चे भूमिपुत्र व ऍड शैलेश कोंडेकर यांचे चिरंजीव सौरभ कोंडेकर हा सदर परीक्षे मध्ये सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर. ग्रूप ए या पदासाठी निवड झाली आहे त्यात सौरभ भारतातून प्रथम क्रमांकावर आला आहे.
कुशाग्र बुद्धिमत्ता व प्रचंड मेहनत याचे हे फलित आहे.
सदर परीक्षे मध्ये महाराष्ट्रातून फक्त सौरभ याची निवड झाली आहे. सौरभ सध्या पंतप्रधान कार्यालय दिल्ली येथे कार्यरत असून त्यांनी नांदेड जिल्ह्याचे नाव देश पातळीवर मोठे केले असून त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात असून त्याचा लवकरच नांदेड येथे सत्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या या यशाबद्दल सकल समाजातून, आप्तेष्ट, मित्रमंडळीतून, हितचिंतक यांचे कडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आई वडील यांचे मार्गदर्शन व आशिर्वाद या मुळे मला यश मिळाले .असे सौरभ म्हणाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!