आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नांदेड परीमंडळातर्फे उत्कृष्ट कामगार पुरस्काराने सन्मानित ….!

Spread the love

नांदेड ( सखाराम कुलकर्णी)
दि. ०१ में रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिन सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. नांदेड शहरातील साठे चौक येथील महावितरण परिमंडळ कार्यालय येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला. नांदेड महावितरण परिमंडळाचे मुख्य अभियंता अनिल डोये यांचे हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. महावितरण परिमंडळाचे मुख्य अभियंता अनिल डोये यांनी महावितरण कंपनीच्या वीज बिल वसुली बद्दल नांदेड परिमंडळ हे मागे आहे म्हणून आपण इतर झोनच्या तुलनेमध्ये विज बिल केली पाहिजे असे मत व्यक्त केले व उपस्थित कामगार बांधवांना मार्गदर्शन करुन कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.तसेच नांदेड,हिंगोली,परभणी विभागातील उत्कृष्ट कामगारांचा मुख्य अभियंता अनिल डोये यांच्या हस्ते यावेळी सन्मान सत्कार करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमाला महावितरणचे सहाय्यक व्यवस्थापक सुदर्शन कालेवाड, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शैलेंद्र पाटील, व्यवस्थापक मिलिंद कांबळे , उप व्यवस्थापक पंडित आंबेकर प्रमोद शिरसागर, गटवार पंडित तेलंग , विजय रणखांब, मोईन शेख शिवकुमार मठवाले मुजीब शेख मोहनसिंग जांगले प्रमोद देशमुख, रमेश वडगावे व अधिकारी,कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!