ताज्या घडामोडी

*चार जणांनी बौध्द मुलाला बेदम मारहाण करून जिवे मारण्याची दिली धमकी!* *एकुरका गावातील घटना ; बौध्द कुटुंब झाले भयभीत!* *मारहाण करणाऱ्या चौघांविरुद्ध केज पोलिसांत ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल!*

केज / प्रतिनिधी आमच्या मुलीला मोबाईल वरून मेसेज का केलास या आरोपावरून एकुरका गावातील एका बौध्द मुलाला गावातील चौघांनी घरातुन उचलुन रानात नेहुन जबर मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याने हे बौध्द कुटुंब भयभीत झाले असुन मारहाण करणाऱ्यांवर केज पोलिसांत ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत अधिक माहिती अशी की केज तालुक्यातील एकुरका गावातील उमेश अशोक कोकाटे वय १७ वर्षे या बौध्द मुलाला गावातील चार जणांनी जबरदस्तीने उचलीत नेहुन जबर मारहाण केली आहे. तर उमेश यास त्याच्या राहात्या घरी बसलेले असताना दि.३ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता सचिन अभिमान मोरे व गणेश तुळशीराम मोरे मोटारसायकलवरून घरी आले व उमेश यास म्हटले की आपल्याला पेंडीचे पोते आणायचे आहे. तु चल असे म्हटले असता उमेश याने त्यांचे सोबत जाण्यास नकार दिल्याने मोटारसायकलवरून आलेल्या सचिन अभिमान मोरे व गणेश तुळशीराम मोरे यांनी त्याला ओढुन गाडीवर बसवून नेमण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात उमेशची आई तिथे आली तुम्ही असे का करता म्हणुन त्या दोघांच्या तावडीतुन आपल्या मुलाला सोडण्याचा प्रयत्न करत असताना सचिन मोरे आणि गणेश मोरे या दोघांनी उमेशच्या आईला ढकलून दिल्याने ती खाली पडली तसेच या झटापटीत उमेची आई हिचे झंपर फाटले उमेश ची आई खाली पडल्याचे पाहून सचिन मोरे व गणेश मोरे या दोघांनी उमेश यास सांगितले की तुझे पप्पा आमच्या शेतात आहेत.तिथे एक काम आहे.तु आमच्या सोबत चल असे म्हणून त्याला मोटारसायकल वर टाकून शेतात नेहले. सदरील मोटारसायकल सचिन मोरे चालवत होता.तर गणेश मोरे मागे बसुन उमेश यास दोघांच्या मध्ये घेऊन शेतात ने‌हले. गाडी थांबताच गाडीवरून खाली उतरत असताना सचिनने पाठिमागुन ढकलल्यामुळे उमेश हा जमिनीवर पडला.त्या दोघांनी उमेश यांस सचिन मोरे यांचे वडील अभिमान मोरे व तुळशीराम मोरे यांच्या समोर नेहले असता अभिमान मोरे यांनी उमेश यास म्हटले की तू आमच्या पोरीला मेसेज का केलास असे म्हणून उमेश यास मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्यास माफी मागायला लावुन त्याचा त्यांच्या मोबाईल मध्ये व्हिडिओ शूटिंग करून घेतली. व परत मारहाण करण्यात आली.यावेळी अभिमान मोरे याने धेडग्या,माहरड्या तुझी लायकी आहे का आमच्याशी बोलण्याची अशी जातीयवाचक शिवीगाळ केली. व तु असे पुन्हा केलेल्यास तुला ठार मारुत अशी धमकी दिली. त्यानंतर तुळसीराम मोरे सचिन यांच्या हातातील लोखंडी रॉड घेऊन उमेश याच्या पाठित जबर मारहाण केली.त्यामुळे उमेश खाली जमीनीवर पडला त्यानंतरही न थांबता तुळशीराम मोरे याने उमेश याच्या पोटात लाथा बुक्या आणि चपलाने जबर मारहाण केली. वरील सर्वांनी मिळून उमेश यास लाथा बुक्याने आणि लोखंडी रॉडने जबर मारहाण केल्याने उमेश हा काही काळ बेशुद्ध पडला. यावेळी उमेश यास काही कळत नव्हते. काही वेळानंतर उमेश यांचे वडील अशोक ऊध्दव कोकाटे यांना फोन करून घटनेची माहिती दिली. उमेश यास सचिन अभिमान मोरे, गणेश तुळशीराम मोरे, अभिमान मच्छिंद्र मोरे व तुळशीराम केशव मोरे या चौघांनी उमेश अशोक कोकाटे यास लोखंडी रॉड,चापटाबुक्या, बुटासह चपलाने जबर मारहाण करून जातीवाचक शीवीगाळ करत उमेश यास जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी केज पोलिसांत उमेश अशोक कोकाटे यांस जबर मारहाण करणाऱ्या सचिन अभिमान मोरे, गणेश तुळशीराम मोरे, अभिमान मच्छिंद्र मोरे व तुळशीराम केशव मोरे यांचे विरुद्ध केज पोलिसांत ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार भा.न्या.सं.(बी एन एस ) २०२३ कलम ११५ (२), ११८(१), ३५२, ३५१(१) व अनुसूचित जाती जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम,१९८९ ३(२)(r), ३(१)(s) व ३(२)(va) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलिस अधीक्षक यांचे मार्गदर्शन खाली केज पोलिस करत आहेत. मात्र या घटनेमुळे एकुरका गावातील कोकाटे कुटुंब भयभीत झाले असुन त्यांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!