ताज्या घडामोडी

कार्लातील श्री एकविरा जोगेश्वरी , खंडाळ्यातील श्री वाघजाई देवीच्या मंदिरासह परिसरात देवीँची मिरवणूकीने प्रतिष्ठापना .

पहाटे सहा वाजता लोणावळा ग्रामिणचे पोलिसनिरिक्षक निलेश माने यांचे हस्ते सपत्निक अभिषेक करण्यात आला.

Spread the love

कार्लातील श्री एकविरा जोगेश्वरी , खंडाळ्यातील श्री वाघजाई देवीच्या मंदिरासह परिसरात देवीँची मिरवणूकीने प्रतिष्ठापना .

आवाज न्यूज: मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा ता.२६(प्रतिनिधी )

श्री एकविरा जोगेश्वरी मंदिरात , खंडाळातील श्री वाघजाई देवीच्या मंदिरात घटस्थापना तसेच परिसरात देवीँची मिरवणूकीने प्रतिष्ठापना करण्यात आली.
आज पहाटे सहा वाजता लोणावळा ग्रामिणचे पोलिसनिरिक्षक निलेश माने यांचे हस्ते सपत्निक अभिषेक करण्यात आला. वेहेरगावच्या सरपंच सौ.आर्चनाताई संदिप देवकर व संदिपशेठ देवकर या दांपत्याचे हस्ते मंदिरात अभिषेक करण्यात आला. तसेच त्यानंतर घटस्थापना करण्यात आल्यानंतर श्री एकविरा देवीची आरती झाली.त्यानंतर सप्तशतीचा पाठ वाचन आठ ते नऊ वाजता झाले.

यावेळी उपसरपंच सौ.काजल मोरेश्वर पडवळ, पोलिसपाटील आनिल पडवळ, व्यवस्थापक मंगेश गायकवाड , आणि बाळू गायकवाड , विश्वस्थ पुजारी नवनाथ देशमुख , माजी सेक्रेटरी संंजय गोविलकर , पुजारी तेजेस खिरे , विजय देशमुख , सप्तशतीचा पाठ वाचणारे गोट्यातात्या खिरे , दत्ताञेय खिरे , आरूण तात्या खिरे , गुरव पुजारी विजय देशमुख , सागर देशमुख , भाऊ देशमुख , सदाशिव देशमुख , नामदेव देशमुख , माजी सरापंच मधुकर पडवळ आदी उपस्थित होते. दर्शनास तसेच विद्यमान सदस्या पूजा अशोक पडवळ तसेच व्यापारी संघ अध्यक्ष संजय देवकर , तसेच अनेक मान्यवर दर्शनास येऊन गेले.सुमारे दोन तास दर्शनास लागता होते.

गडावर इतकी गर्दी होती की , वाहनतळापर्यत जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीत अडकलेले असल्याने मार्गावर बाजूला दुचाकी व चारचाकी वाहने पार्कींग केलेली दिसली.
पोलिस निरिक्षक निलेश माने यांचे मार्गदर्शनाखाली एकविरा मंदिराजवळ गाभाऱ्यात हवालदार श्री.गाले , श्री.बांबळे , असे गाभाऱ्यात दिवसा ८ व राञी पाच पोलिस कर्मचारी , इक्झिट चे प्रवेशद्वारावर दिवसा चार व राञी चार असा चोख बंदोबस्त गडावर राहणार आहे.

परिसरात वाहनतळापर्यत जाणाऱ्या मार्गावरील चार पाच पोलिस कर्मचारी , पाचपायरी मंदिराजवळ चार पाच महिला गृहरक्षकदलाचे जवान असे बंदोबस्तामुळे कुठेही वादावादी , वा वाहतूक कोंडी झाली नाही.. गड पायथा व गडावरीस दुकानदारांनी मोठ्या प्रमाणात माल विक्री करीता ठेवला आहे. मंदिरावर आकर्षक रोषणाई कापर्डे (कडूस ) ,फुलांचे सजावट मंदिरात व समोर प्रविण देशमुख यांचेतर्फे करण्यात आली आहेत.

महानवमीला पहाटेपासूनच होमहवन मान्यवरांचे हस्ते करण्यात येईल. बलीदान पारंपारिक रितिरिवाजानुसार होईल.असे मंदिरासमोर पुजारी यांचेकडून समजले..
खंडाळातील श्री.वाघजाई मंदिरातही खंडाळा येथून देवीच्या मुखवट्याची पालखी व रथामधून ढोलताशांच्या गजरामधे मिरवणूकीने देवीच्या मंदिरात विधिवत घटस्थापना करण्यात आली.लोणावळा शहर व ग्रामिण भागात गावोगावी विविध देवांचे व देवीच्या मंदिरात घटस्थापना करण्यात आली..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!