आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

संस्कृत अभ्यास वर्गाचा समारोप उत्साहात संपन्न …!

Spread the love

सोलापूर:- ( रत्नाकर लोंढे याजकडून) विवेकानंद केंद्र व संस्कृत भारती शाखा सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने संस्कृत अभ्यास वर्ग दिनांक 21 ते 31 मे 2024 पर्यंत उत्साहात संपन्न झाला.सदर वर्ग शुभांगी कुलकर्णी व निखिल बडवे यांनी घेतला. या वर्गाच्या समारोप कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे मा.अरविंद दोशी ( प्रसिद्ध उद्योग पती तथा अध्यक्ष शेठ गोविंदजी रावजी आर्युवेद महाविद्यालय,सोलापूर) तसेच विवेकानंद केंद्र प्रमुख दीपक जी पाटील उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचा परिचय हरिष याने केला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामधून निखिल बडवे यांनी संस्कृतचे व संस्कृत भारतीचे महत्त्व विशद केले. विद्यार्थ्यांनी संस्कृत मधून गीत, नाटक, कथा, संवाद इत्यादी कार्यक्रम सादर केले. यामध्ये वयोगट आठ वर्ष ते वीस वर्षापर्यंतच्या एकूण 45 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. प्रमुख पाहुणे अरविंद दोशी यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनचे कौतुक केले तसेच आयुर्वेदात संस्कृत ला महत्त्व असल्याचे सांगितले. मा.हर्ष गोडबोले यांनी गेल्या 40 वर्षापासून आषाढस्य प्रथम दिनी मेघदूत वाचत असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना संस्कृत शिका,वाचा, अभ्यास करा असे आवाहन केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी कुलकर्णी तर आभार केंद्र प्रमुख सुहास देशपांडे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!