मावळ तालुका अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने कालेगाव येथे गरजूंना अन्नधान्य वाटप
मावळ : तालुक्यातील अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने कालेगाव तसेच शिवगंगा वृध्दाश्रम, कामशेत येथे गरीब व गरजूंना, वारकऱ्यांना, अंध – अपंग, विधवा महिला यांना मोफत अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले. तसेच मंडळाच्या वतीने वडगाव येथे रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. त्यात अनेक वारकरी बांधवांनी सहभाग घेतला.
पंढरीच्या वारीचे औचित्य साधून या कार्यक्रमात मावळ तालुक्यातील दिंड्यांचे अध्यक्ष यांचा तुकाराम भांगरे पाटील, दत्तोबा भोते,लक्ष्मण काळे, लक्ष्मण तळावडे, अनुसयाबाई म्हस्के आदींचे हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच या कार्यक्रमात महावीर हाॅस्पिटलच्या वतीने डाॅ.विकेश मुथा यांच्या हस्ते पाचशे वारकऱ्यांना मोफत उपचारासाठी आरोग्य कार्ड वाटण्यात आली.
यावेळी अध्यक्षस्थानी महाविर महाराज सुर्यवंशी तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाध्यक्ष सुखदेव महाराज ठाकर उपस्थित होते. कोरोनाने उद्भवलेल्या परीस्थितीमध्ये आपणही समाजाचे काही तरी देणे लागतो हा उदात्त भाव मनी बाळगून मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वखर्चाने मदत देऊ केली, असे दिनकर निंबळे यांनी प्रास्ताविकात बोलताना सांगितले. यावेळी संतोषभाऊ कुंभार, शांताराम बोडके,दत्ता महाराज शिंदे, राजारामजी असवले आदींनी मनोगत व्यक्त केले.सुत्र संचलन संजय कालेकर यांनी तर आभार भरत वरघडे गुरुजी यांनी मानले.
यावेळी सचिन ठाकर, मुकुंद खांडभोर, मारूती वावरे, नंदाराम धनवे, संगिता फाळके, आत्माराम शिंदे, विजय गाडे, आशा भोसले संतोष काटकर, उल्हास चोपडे, सुमन घरदाळे, वनिता जाधव आदींसह वारकरी हजर होते.




