आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे मी या पदापर्यंत पोहचलो आहे-सचिन बनसोडे*

Spread the love

अक्कलकोट (तालुका प्रतिनिधी)दि.१२ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधाना मुळेच माझी रेल्वे सेवेत नियुक्ती झाली आणी विविध क्षेत्रात बढती ही मिळाली आहे.असे प्रतिपादन सोलापूर रेल्वे विभागाचे मुख्य कल्याण निरीक्षक सचिन बनसोडे यांनी व्यक्त केली आहे. त्यांना बढती मिळाल्याने रिपाइं(आठवले गट) च्या वतीने सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी व दुधनी शहर अध्यक्ष गोरखनाथ धोडमनी यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला 
सचिन बनसोडे मुंबई नार्कोटिक कंट्रोल ब्यूरो येथे बढती झाल्याने सोलापूर मंडल रेल्वे मजदूर कार्यालय येथे सचिन बनसोडे यांच्या रिपाइं तर्फे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता . याप्रसंगी सत्कार स्विकारुन सत्काराला उत्तर देतांना बोलत होते.या प्रसंगी कार्यालय अधिक्षक अजय लोंढे, मुख्य तिकिट निरीक्षक श्रावण चित्यालकर,वरीष्ठ टेक्निशियन प्रताप जाधव,दुधनी बुकींग  सुपर  वायजर वेलुमुरगन केशवन,सोलापूर बुकींग सुपर वायजर बालकृष्ण स्वामी, रिपाइं जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी, शहर अध्यक्ष गोरखनाथ धोडमनी,आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!