क्रीडा व मनोरंजनमहाराष्ट्र

होळेश्वर विद्यालयाची विद्यार्थिनी परभणी येथे 39 किलो वजन गटात प्रथम स्टाईल कुस्ती स्पर्धेत.

( होळ.भरारी न्युज.) होळ येथील होळेश्वर विद्यालय होळ ची विद्यार्थिनी परभणी येथे कुस्ती स्पर्धेसाठी गेली असताना त्या ठिकाणी स्पर्धेत सहभाग घेऊन 39 किलो वजन गटातून प्रथम क्रमांक मिळवला आहे दि.16 ऑक्टोबर 2024 रोजी राजे संभाजीनगर तालीम परभणी, या ठिकाणी झालेल्या फ्री वर्ग 7 वी अ मध्ये शिकत असलेली खेळाडू विद्यार्थीनी कु . शिंदे ऋतूजा हनूमंत प्रथम क्रमांक मिळवत होळेश्वर विद्यालया चे नाव उंचावले असून तिची राज्यस्तरीय स्पर्धसाठी निवड झालेली आहे. तरी विद्यार्थिनी गावी शिक्षण घेत असणाऱ्या शाळेत आल्यानंतर त्या विद्यार्थिनीचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी विद्यालयाचे प्राचार्य / मुख्याध्यापक श्री मलदोडे सर , सचिव नरेंद्रजी काळे सर, अध्यक्ष भागवतरावजी गोरे ( दादा ) यांनी खेळाडू विद्यार्थीनीचे अभिनंदन केले . पुढील स्पर्धेसाठी सर्व गुरुजन वर्ग व शिक्षिका यांनी तिला शुभेच्छा दिल्या विद्यार्थिनीला कुस्ती स्पर्धेसाठी सतत मार्गदर्शन करणारे विद्यालयाचे क्रीडा शिक्षक. बर्डे दादासाहेब श्रीधर यांचे विद्यार्थिनीला मार्गदर्शन मिळाल्यामुळेच मुलगी आज परभणी सारख्या स्पर्धेत भाग घेऊन होळेश्वरची विद्यार्थिनी ही प्रथम आली आहे विद्यार्थिनीसह शिक्षकांचे सुद्धा पालकाकडूनअभिनंदन व विद्यार्थिनीला सर्व स्तरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Spread the love

होळेश्वर विद्यालयाची विद्यार्थिनी परभणी येथे 39 वयोगटात प्रथम स्टाईल कुस्ती स्पर्धेत.,,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!