ताज्या घडामोडी

कमला एज्युकेशन सोसायटीच्या प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयामध्ये पालक मेळावा संपन्न…

सन 2022 या चालू शैक्षणिक वर्षातील कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील इ. 12 वी च्या पालकांचा मेळावा आयोजित..

Spread the love

कमला एज्युकेशन सोसायटीच्या प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयामध्ये पालक मेळावा संपन्न

 आवाज न्यूज तळेगाव दाभाडे २२ जुलै चिंचवड  प्रतिनिधी    सन 2022 या चालू शैक्षणिक वर्षातील कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील इ. 12 वी च्या पालकांचा मेळावा आयोजित करण्यात आला. कला, वाणिज्य व विज्ञान अशा वेगवेगळ्या विभागानुसार हा पालक मेळावा घेण्यात आला.

या मेळाव्यात कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे यांनी पालकांशी संवाद साधताना पालक, पाल्य आणि शिक्षक यांचा एक संवादात्मक मेळ असणे गरजेचे आहे, असे सांगत शिक्षकांइतकीच पालकांचीही आपल्या मुलांकडे लक्ष देण्याची जबाबदारी आहे, असे सांगितले. यावेळी पालकांशी प्रश्न उत्तराच्या स्वरूपात संवाद झाला. महाविद्यालयाच्या शैक्षणिक कार्याबद्दल व शिक्षक विद्यार्थ्यांसाठी घेत असलेल्या मेहनतीबद्दल पालकांनी कौतुक केले.

या मेळाव्यास कमला शिक्षण संकुलाचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा, प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे तसेच कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या तीनही विभागाच्या समन्वयिका व सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते. पालक सभेला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रवींद्र निरगुडे, प्रा. सुकन्या बॅनर्जी यांनी केले तर; आभारप्रदर्शन प्रा. चिन्मयी जैन यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!