*भारतीय स्पेशल ऑलिम्पिक्सच्या सोलापूर जिल्हा निवडणूक अधिकारी पदावर ॲड. अरविंद अंदोरे यांची नियुक्ती*

सोलापूर* – भारतीय स्पेशल ऑलिम्पिक्स – महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्हा समिती निवडीकरिता सोलापूर येथील जेष्ठ विधिज्ञ अरविंद भास्कर अंदोरे यांची जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ॲड. अरविंद अंदोरे यांच्या नियुक्तीचे पत्र अध्यक्ष तथा निवडणूक इनचार्ज, स्पेशल ऑलिम्पिक्स भारत, महाराष्ट्र डॉ. मेधा किरीट सोमय्या यांनी दिले आहे.

स्पेशल ऑलिम्पिक्स भारत, महाराष्ट्र राज्य संघटनेच्या सन २०२३ ते २०२७ या कालावधीत काम करणाऱ्या समितीच्या निवडणूकीसाठी सोलापूर जिल्हा समिती ( प्रतिनिधी ) निवडण्याचा अधिकार या पत्राद्वारे डॉ. मेधा किरीट सोमय्या यांनी ॲड. अरविंद अंदोरे यांना दिला आहे. तसेच नवनिर्वाचीत सोलापूर जिल्हा समितीमधील दोन प्रतिनिधी राज्य संघटनेच्या कार्यकारी समितीच्या निवडणुकीसाठी नियुक्त करण्याचे अधिकारही ॲड. अरविंद अंदोरे यांना देण्यात आले आहेत.
ॲड.अरविंद अंदोरे मागील ३६ वर्षांपासून वकिली व्यवसायात कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे त्यांचा सांस्कृतीक, क्रीडा, सामाजिक, राजकीय अश्या विविध क्षेत्रात चांगला नावलौकिक आहे. ॲड. अरविंद अंदोरे यांच्या या नियुक्तीबद्दल त्यांचे सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. सुरेश गायकवाड यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील वकीलवर्ग, क्रिडा, राजकीय, सांस्कृतीक, सामाजिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.



