नाट्यकेशी अकॅडमी जुळे सोलापूर तथा संस्कृत भारती सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने *संस्कृत संभाषण वर्ग संपन्न*

सोलापूर:-(उपसंपादक रत्नाकर लोंढे) नाट्यकेशी अकॅडमी जुळे सोलापूर तथा संस्कृत भारती सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 11 एप्रिल 2023 ते 21 एप्रिल 2023 पर्यंत के.एल.ई इंग्लिश मीडियम स्कूल येथे संस्कृत संभाषण वर्ग संपन्न झाला.

समारोप कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रथम भारत मातेच्या प्रतिमेचे शिबीर शिक्षक निखिल बडवे नाट्यकेशी अकॅडमीचे शिक्षक ऋषिकेश पागे तसेच उपस्थित पालक हेमंत गोळवलकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

प्रास्ताविकांमधून निखिल बडवे यांनी संस्कृत भारतीच्या कार्याविषयी माहिती सांगितली. शिबिरातील विद्यार्थ्यांनी गीत, संवाद, नृत्य, संस्कृत भाषा महत्व, इत्यादी कार्यक्रम संस्कृत मधून सादर केले. उपस्थित पालक हेमंत गोळवलकर व डॉ.सौ.माणिक बागेवाडीकर यांनी आपल्या मनोगतातून सद्य काळात असलेले संस्कृतचे महत्त्व पटवून दिले.तसेच विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कृत मधून ऋषिकेश पागे तर आभार सपना मिठापल्ली यांनी मानले.



