आपला जिल्हाताज्या घडामोडी
बीडमध्ये गौरव महोत्सवाचे आयोजन साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे जयंतीची जय्यत तयारी
बीड/प्रतिनिधी साहित्य, सामाजिक न्याय आणि क्रांतीशील विचारसरणीचे प्रणेते साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त बीड शहरात “साहित्य सम्राट गौरव महोत्सव” उत्साहात साजरा होणार आहे. हा भव्य महोत्सव मंगळवार, दि. 29 जुलैपासून 1 ऑगस्टपर्यंत दररोज विविध कार्यक्रमांसह रंगणार आहे.डीपीआयचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य चांदणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समिती, बीड शहर यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव केवळ सण नव्हे, तर सामाजिक परिवर्तनाची दिशा दाखवणारा एक आदर्श ठरणार आहे, असे आयोजकांनी सांगितले. समितीचे अध्यक्ष बळीराम गवते आणि सचिव सुनील पाटोळे यांनी बीडमधील नागरिकांना या गौरव सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या काळात दरवर्षी प्रमाणे यंदाही साहित्य दिंडी, विचारगोष्टी, सांस्कृतिक कार्यक्रम आशा अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.अण्णाभाऊ साठेंच्या विचारांचा जागर घडवणारा आणि तरुण पिढीला प्रेरणा देणारा हा महोत्सव बीडकरांसाठी अभिमानाचा ठरणार आहे. आयोजकांच्या म्हणण्यानुसार, “अण्णाभाऊंच्या कार्याचा व साहित्याचा गौरव करताना त्यांची सामाजिक जाण, श्रमिकांसाठीचा लढा आणि शोषितांसाठीची चळवळ नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा आमचा उद्देश आहे.” त्यामुळे या साहित्यसम्राट गौरव महोत्सवात मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समिती बीड शहर यांनी केले आहे. असे होणार कार्यक्रम साहित्य सम्राट गौरव महोत्सवात, मंगळवार दि.29 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता 500 महिलांना साडी वाटपाचा कार्यक्रम, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे सभागृह मैदान चांदणे वाडा येथे संपन्न होईल. बुधवार दि.30 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता, सुप्रसिद्ध गायिका मंजुषा शिंदे यांचा संगीत रजनी कार्यक्रम डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे होणार आहे. शुक्रवार दि.1 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता साहित्य दिंडी, कर्नाटक वाद्य प्रमुख आकर्षण, त्यानंतर सकाळी 10 वाजता अण्णाभाऊ साठे पुतळा येथे ध्वजारोहण, जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पार पडणार आहे. सायंकाळी 5 वाजता भव्य मिरवणूक निघणार आहे.




